मोकाट जनावरांची झुंज लागल्याने मालवण बाजारात तारांबळ

17

सामना ऑनलाईन । मालवण

सोमवारी आठवडा बाजारात ऐन गर्दीमोच मोकाट गुरांमध्ये झुंज लागल्याची घटना सोमवारी (९) घडली. यामुळे विक्रेते व ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. गुरांच्या या झुंजीत काही विक्रेत्यांच्या थाटलेल्या तात्पुरत्या दुकानांची मोडतोड झाली. यावेळी काही व्यापारी व नागरिकानी या गुरांना आवर घालत त्यांना पळवून लावले.

दरम्यान, या प्रकारामुळे मालवणातील मोकाट गुरांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाबाबत नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या