नगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त

6


सामना प्रतिनिधी । नगर

धनगरवाडी शिवारातील गुलशन खडी क्रेशरलगत असलेल्या गोदामात अवैधरित्या साठवलेल्या गोवंशांच्या कातड्याचा साठ्यावर एमआयडीसी पोलीस व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांनी धाड टाकून संयुक्त कारवाई केली. गायींची अवैधरित्या कत्तल करुन कातड्यांची विक्री करण्यासाठी त्याचा साठा करण्यात आला होता. या प्रकरणी अंजुम तांबटकर (घासगल्ली), अनिस व बाबु सय्यद (जेऊर) यांच्याविरोधात एमआयडीसी पोली ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी तीन जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हे गोदाम तांबटकरच्या मालकीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोवंशांची सुमारे 13 लाख रुपयांची कातडी व 1 हजार किलो ग्रॅम वजनाची लहान-मोठी हाडे असा एकूण 14 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील विनोद चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकासह जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या