मुंबई सफारी :- लेणी

सामना ऑनलाईन । मुंबई

लेणी म्हटलं की, आपल्यासमोर येतं ते फक्त दगडात कोरलेली एलिफंटा किंवा कान्हेरी लेणी. पण या व्यतिरिक्त आणखीही लेणी मुंबईत आहेत. त्यामुळे वीकेण्डचं निमित्त साधून कुटुंबासह येथे पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.

मुंबईतील निवडक लेणी

कान्हेरी लेणी
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी लेणी आहे. हे ठिकाण अतिशय शांत, स्वच्छ, आणि सुंदर असून समुद्रसपाटीपासून १५०० फूट उंचीवर आहे. हिंदूस्थानातील ऐतिहासिक वास्तूपैकी ही एक वास्तू असल्याने विदेशी पर्यटक येथे आवर्जून येतात.

cave-1

महाकाली लेणी
महाकाली लेणी या कोंडीवटी नावानेही ओळखले जातात. महाकाली लेणी जोगेश्वरी येथे असून या लेण्या पूर्वेपासून पश्चिमेला पसरल्या आहेत. महाकाली लेणीच्या पायथ्याशी महाकालीचे मंदिर असल्याने तिला महाकाली लेणी असे म्हणतात.

cave-2

जोगेश्वरी लेणी
जोगेश्वरी येथे असणारी फारशी कोणला माहित नसली तरी ही लेणी बघण्यासारखी आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्वात जुनी लेणी असून लांबीच्या दृष्टीने सर्वात मोठीही आहेत.

cave3

मुंबई सफारी :- समुद्र किनारे

मंडपेश्वर लेणी

मंडपेश्वर लेणी ही माउंट परिसर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीच्या पूर्वेकडील पायथ्याशी आहे. ही लेणी दहिसरजवळ असून या लेणीमध्ये सर्वात मोठी शिल्पाकृती आहे.

cave4

एलिफंटा लेणी
ही लेणी मुंबईजवळील घारापुरी बेटावरती असून गेट वे ऑफ इंडिया येथून ये जा करण्यासाठी तिथे बोटीही उपलब्ध आहेत. एलिफंटा लेणीला घारापुरी लेणी म्हणूनही ओळखले जाते. या लेणीत ७ शैलकृत लेणी असून १९८७ साली युनेस्कोने जागतिक वारसा यादीत सामाविष्ट केले आहे.

cave5

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील आपल्या पसंतीच्या लेण्यांची माहिती आम्हाला नक्की कळवा. खाली दिलेल्या प्रतिक्रियेच्या बॉक्समध्ये टाइप करुन ही माहिती तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता.