रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारीला अटक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानातील सात बँकांची ३,६९५ कोटींची फसवणूक करणारे रोटोमॅक पेनचे मालक विक्रम कोठारी आणि त्यांचा मुलगा राहुल कोठारींना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने याआधीच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युनियन बँक यांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

विक्रम कोठारींचा घोटाळा ८०० नाही तर ३ हजार ६९५ कोटींचा

सीबीआयने कोठारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या घरावर व कार्यालयावर धाडी टाकल्या. या धाडसत्रात कागदपत्रांची पडताळणी केली असता हा महाघोटाळा उघड झाला. विक्रम कोठारींचा घोटाळा २००८ पासून सुरू असल्याचे सीबीआय तपासामध्ये समोर आले आहे.