निशल मोदीच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयचा गृहमंत्रालयाकडे अर्ज

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याचा भाऊ निशल मोदी याला हिंदुस्थानात आणण्यासाठी सीबीआयने कसोशीने प्रयत्न सुरू केले असून त्या पार्श्वभूमीवर सीबीआयने तिच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तसा अर्जही केला आहे.

गेल्या शुक्रवारी सीबीआयने केंद्रीय गृहमंत्रालयाशी त्याबाबतचा पत्रव्यवहार केला. त्याची दखल घेऊन गृहमंत्रालय लवकरच प्रत्यार्पणाबाबतचे पत्र बेल्जियमला पाठविणार आहे. निशल मोदी हा बेल्जियमचा नागरिक असून सीबीआयच्या विनंतीवरून इंटरपोलने याआधीच त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावलेली आहे.