व्हिडीओ- दारूप्रेमी चोर सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलीस मागावर

सामना ऑनलाईन, ठाणे

भिवंडीतील एका वाईन शॉपमध्ये चोरी झाली असून इथल्या गल्ल्यातील पैसे तर चोराने चोरलेच शिवाय दारूच्या बाटल्याही चोरून नेल्या. हा चोर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. शहरातील कामतघर या परिसरात असलेल्या जे.एस.वाईन्स शॉपमध्ये हा प्रकार घडला आहे. दुकानाच्या मागील भिंत फोडून या चोरट्याने आत प्रवेश केला. या चोराने गल्ल्यातील २० हजार रूपये आणि दारूच्या काही बाटल्या गायब केल्याचं दुकान मालकाचं म्हणणं आहे. भिवंडी शहर पोलीस ठाण्यात या चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.