पाकडे जिंकले, कश्मीरात आतषबाजी

सामना ऑनलाईन । श्रीनगर

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकडय़ांनी हिंदुस्थानचा दारुण पराभव केला. यामुळे अवघा देश निराशेच्या गर्तेत असताना कश्मीरात मात्र फटाक्यांची आतषबाजी झाल्याचा प्रकार घडला आहे. हजारो कश्मिरी तरुण विजयी उन्मादात लाल चौकात जमा झाले आणि पाकिस्तान झिंदाबादचा नारा देत त्यांनी जल्लोष केला. या घटनेमुळे प्रत्येक हिंदुस्थानप्रेमी नागरिकाच्या दुःखाची जागा आता संतापाने घेतली आहे.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे महायुद्ध असते. दोन्ही देशांतील करोडो क्रिकेटप्रेमी टीव्हीला डोळे लावून बसतात आणि क्रिकेटच्या मैदानापेक्षा मैदानाबाहेरच अधिक ईर्षा आणि जोश असतो. सुमार गोलंदाजी आणि ढेपाळलेली फलंदाजी यामुळे हिंदुस्थानी संघाने नांगी टाकली. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी खिशात टाकली. हिंदुस्थानच्या या दारुण पराभवाने देशातील हरएक क्रिकेटप्रेमी निराश झाला.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे असे निराशाजनक चित्र असताना कश्मीरात मात्र जल्लोष सुरू होता. हिंदुस्थानी खेळाडूंच्या विकेट पडत होत्या तसे येथे फटाके फुटत होते. पाकिस्तान विजयी झाल्यानंतर तर कश्मीरातील अनेक गावांमध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत तरुण रस्त्यावर उतरले आणि त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. दारुण पराभवाने देशातील हरएक क्रिकेटप्रेमी निराश झाला.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे असे निराशाजनक चित्र असताना कश्मीरात मात्र जल्लोष सुरू होता. हिंदुस्थानी खेळाडूंच्या विकेट पडत होत्या तसे येथे फटाके फुटत होते. पाकिस्तान विजयी झाल्यानंतर तर कश्मीरातील अनेक गावांमध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत तरुण रस्त्यावर उतरले आणि त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

फुटीरतावादी मिरवाझचे ट्विट

कश्मीरातील फुटीरतावाद्यांचे पाकिस्तानप्रेम उतू जात असते याचा दाखलाही लगेच मिळाला. मिरवाझ उमर फारुख याने कश्मीरात जणू लवकरच ईद आली असे वाटते आहे. फटाके फुटताहेत. पाकिस्तानी संघाचे अभिनंदन, असे ट्विट करून हिंदुस्थानद्वेषाची गरळ ओकली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानने जेव्हा इंग्लंडला हरवले होते तेव्हाही कश्मीरात असाच जल्लोष झाला होता. मिरवाझने तेव्हा ट्विट करून पाकडय़ांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

नो बॉलने घात केला

 

जसप्रीत बुमराह टाकत असलेल्या डावातील चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर फखर जमान यष्टीरक्षक धोनीकरवी झेलबाद झाला होता. मात्र बुमराहचा तो चेंडू नो बॉल ठरला. त्यानंतर जीवनदान मिळालेल्या फखरने 114 धावांची दणदणीत खेळी केली. याच नो बॉलने हिंदुस्थानचा घात केला.

हॉकीत हिंदुस्थानने पाकिस्तानला चिरडले

एकीकडे टीम इंडियाने लंडनमध्ये पाकिस्तानसमोर लोटांगण घालून चॅम्पियन्स ट्रॉफी त्यांना बहाल केली तर दुसरीकडे नजीकच सुरू असलेल्या वर्ल्ड हॉकी लीग सेमी फायनलच्या लढतीत हिंदुस्थानच्या हॉकीपटूंनी पाकडय़ांना चिरडण्याची अभिमानास्पद कामगिरी केली. उपांत्य फेरीची ही लढत हिंदुस्थानने 7-1 अशी जिंकली. हरमनप्रीत सिंह, तलविंदर सिंह आणि आकाशदीप सिंह यांनी प्रत्येकी दोन गोल केले.