गिरीश कर्नाड यांना मान्यवरांची श्रद्धांजली

76

सामना ऑनलाईन, मुंबई

हिंदुस्थानी रंगभूमीला प्रयोगशील नाटकांचं देणं देणाऱ्या कर्नाड यांचे आपण सारेच ऋणी आहोत. माझ्यावर त्यांचे खूप उपकार आहेत. कर्नाडजी यांनी माझे नाव ‘निशांत’ चित्रपटातील भूमिकेसाठी श्याम बेनेगल यांना सुचवले. माझ्या अभिनय क्षमतेवर विश्वास टाकणारी ती पहिली व्यक्ती होती. त्यांना मी कधीच विसरू शकत नाही-नासिरुद्दीन शहा, ज्येष्ठ अभिनेते

 गिरीश कर्नाड म्हणजे सांस्कृतिक घडामोडीतील एक अतिशय विद्वान माणूस. हिंदुस्थानी रंगभूमीवर त्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अत्यंत मोठा पुरस्कर्ता म्हणून कर्नाड यांच्याकडे पाहायला हवे-डॉ जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक

त्यांच्या लेखनाने नेहमीच मला प्रोत्साहित केले. त्यांच्या लेखनापासून अनेकांनी प्रेरणा घेतली. त्यांचे अनेक चाहते लेखक आहेत. या मंडळींनी कर्नाड यांच्यासारखे लेखन केले, तरी त्यांच्या जाण्याचे दु:ख काही प्रमाणात हलके होईल –कमल हासन, ज्येष्ठ अभिनेते

गिरीश एफटीआयआयचे संचालक म्हणून काम पाहत होते तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. त्यांचं जाणं धक्कादायक आहे. हिंदुस्थानी रंगमंचाला आधुनिक रूप देणारा दिग्गज कलाकार आपण गमावलाय. गिरीश हे एक अतिशय पारदर्शक व्यक्तिमत्वहोतं. तरुण लेखकांसाठी ते नेहमीच मदतीचा हात पुढे करत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे- सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार

गिरीश कर्नाड यांचे विविध माध्यमातील बहुरंगी कार्य लक्षात राहील. आपल्या मूल्यांवर ते आत्मीयतेने बोलायचे. कर्नाड यांचे कार्य अनेक पिढय़ांच्या कायम स्मरणात राहील. कर्नाड यांच्या स्म़ृतीस विनम्र अभिवादन! –पंतप्रधान नरेंद्र मोदी

 गिरीश कर्नाड हे बहुपेडी व्यक्तिमत्त्व होते. महान रंगकर्मी म्हणून हिंदुस्थानी रंगभूमीला त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. पौराणिक कथांना समकालीन प्रश्नांशी जोडत त्यावर भाष्य करणारे त्यांचे लेखन समाजाच्या डोळय़ात अंजन घालणारे आणि विचारप्रवाहित करणारे होते. हिंदुस्थानी रंगभूमीची पुनर्रचना करणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव अग्रणी आहे. मराठी संस्कृतीशी त्यांची अतूट नाळ जोडलेली होती. गिरीश कर्नाड यांच्या निधनानं आपण हिंदुस्थानी चित्रपट आणि नाटय़सृष्टीतील एक उत्तम क्यक्तिमत्त्व गमावलंय- देवेंद्र फडणकीस, मुख्यमंत्री

 लहानपणापासून गिरीश दादा म्हणजे माझे हीरो होते. मी त्यांना दादा म्हणायचे. त्यांनी लिहिलेलं ‘ययाति’ हे माझं पहिलं नाटक होतं. या नाटकाचे लेखन गिरीश कर्नाड यांनी केलंय. केवळ या एका कारणासाठी माझ्या आईवडिलांनी मला त्या नाटकात काम करण्यासाठी संमती दिली. ते कुठेही कधीही भेटले तर अगदी प्रेमानं समोरच्या माणसाची विचारपूस करायचे. गिरीश कर्नाड गेले हा माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे. ते माझ्या आणि नाटय़-साहित्यक्षेत्रातील प्रत्येकाच्या आठकणीत कायम जिवंत राहतील– चित्रा पालेकर, ज्येष्ठ अभिनेत्री- लेखिका 

अत्यंत बुद्धिवान अभिनेते, दिग्दर्शक, लेखक गिरीश कर्नाडजी यांना मी श्रद्धांजली वाहत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो!- लता मंगेशकर, ज्येष्ठ गायिका

माझे आदर्श, गिरीश काका यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसलाय. माझा पहिला चित्रपट ‘चेलुकी’साठी मी तुमची कायम ऋणी असेन. तुम्ही माझ्याकर जे संस्कार केले, मला प्रेम दिलं त्या सगळय़ासमोर धन्यवाद हा शब्द फारच छोटा आहे. तुम्ही रुजवलेली मूल्यं कायम माझ्यासोबत असतील– सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

महान कलाकार आपल्यातून गेला. मला कर्नाड यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य मिळाले. माझा पहिला कन्नड चित्रपट मी त्यांच्यासोबत केला होता-मिलिंद शिंदे, अभिनेता

खूप धक्कादायक आहे. त्यांच्या कुटुंबाला मी अद्याप भेटले नाही. गिरीश आणि माझी 43 वर्षांची मैत्री. या धक्क्यातून सावरायला मला एकटीला सोडा. अधिक प्रतिक्रिया विचारू नका, ही विनंती!– शबाना आझमी, ज्येष्ठ अभिनेत्री

व्रतस्थ रंगकर्मीला श्रद्धापूर्वक कंदन! –नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेते 

आपली प्रतिक्रिया द्या