पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादण; मरे, परे आणि विमानतळ ठप्प

11

सामना ऑनलाईन । ठाणे

पहिल्याच पावसात मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडाली. थोड्याश्या पावसाने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने मान टाकली आहे. तसेच मुंबई विमानतळावरही काही विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली आहे.

मध्य रेल्वेवर कोपर स्थानकाजवळ गाड्या खोळंबल्या आहेत, तर पश्चिम रेल्वेवर वांद्रे आणि अंधेरीजवळ तांत्रिक बिघाडामुळे लोकल ठप्प झाली आहे.

कोपर स्थानकात कर्जतच्या दिशेने जाणार्‍या गाडीवर पेंटाग्राफचे स्पार्क उडाले. त्यामुळे अप आणि डाऊन वरील गाड्या ठप्प झाल्या आहेत.

कोपर जवळ पेंटग्राफ आणि ओएचइमध्ये स्पार्किंग झाल्यामुळे लोकल सेवा चांगलीच प्रभावित झाली आहे. कोपरहून 8 वाजून 3 मिनिटानी कर्जत गाडी कोपर स्थानकतच अडकली आहे. तसेच  नागपूर दुरोंतो देखील दिवा स्थानकावर अडकली आहे. कोपर स्थानकावरील स्पार्क इतका मोठा होता की काही वेळासाठी संपूर्ण स्थानकावारील वीज गेली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेली कल्याण जलद लोकल कुर्ला स्थानकावर 15मिनिटे उभी होती.

गाड्या खोळंबल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. त्यात रेल्वेकडून कुठल्याच प्रकारची घोषणा न झाल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या