देशाचे बजेट १ फेब्रुवारीला

14

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २९ जानेवारीपासून सुरुवात होत असून १ फेब्रुवारीला २०१८-१९ सालचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मोदी सरकारचे हे चौथे बजेट असणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली हे बजेट मांडतील. गेल्या वर्षीपासून ‘जीएसटी’ करप्रणाली अस्तित्वात आली आहे. त्यामुळे नवीन करप्रस्ताव येण्याची शक्यता कमी आहे. आयकरमधून सूट मिळण्याची मर्यादा वाढते का याकडे नोकरदारांचे लक्ष असेल.

आपली प्रतिक्रिया द्या