प्रगती एक्सप्रेस बंद पडली, मध्य रेल्वे कोलमडली

सामना ऑनलाईन । ठाणे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पुण्यासाठी निघालेल्या प्रगती एक्स्प्रेसचे इंजिन ठाणे आणि मुलुंडदरम्यान बंद पडल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने मुंबईकर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. घराकडे निघालेल्या प्रवाशांची कोंडी होऊ नये म्हणून जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. मात्र ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने मुंबईतील स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.