आठवड्याच्या सुरुवातीलाच रखडमपट्टी… मध्य रेल्वे 20 मिनिटे उशिराने

सामना ऑनलाईन । ठाणे

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची आठवड्याची सुरुवातच रडत खडत झाली आहे. या मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी अप गाड्यांची वाहतूक सुमारे 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे. कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने या मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू असल्याचे कळते. दरम्यान, दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले असले तरी आणखी काही वेळ वाहतूक उशिरानेच सुरू राहणार आहे.

सोमवारी सकाळच्या वेळात कोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने या वाहतूक मंदावली. मुंबईच्या दिशेने अप धिम्या आणि जलद अशा दोन्ही मार्गांवर गाड्यांची रांग लागल्याचे पाहायला मिळत होते. ऐन गर्दीच्या वेळी बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत.