चाकरमान्यांनो, आज घाई करा! सीएसएमटीहून शेवटची लोकल 12.25 वाजता

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत तांत्रिक कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी सीएसएमटीहून रा.12.25 वाजता डाऊन धिम्या मार्गावरून सुटणारी कर्जत लोकल ही शेवटची लोकल असणार आहे. तर सीएसएमटीला जाणारी शेवटची अप धिमी आसनगाव लोकल रा.12.10 वाजता भायखळाहून सुटेल.

अप धिम्या मार्गावरील भायखळा स्थानकातून रात्री 12.36 ते 1.10 आणि पहाटे 4.37 ते सकाळी 6.06 या वेळेतील लोकल भायखला ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. तर सीएसएमटी स्थानकातून पहाटे 4.48 ते सकाळी 6.02 या वेळेत डाऊन धिम्या मार्गावरुन चालणाऱया लोकल सीएसएमटी ते भायखळा दरम्यान डाऊन जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे या लोकल मस्जिद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकात थांबणार नाहीत. परिणामी या काळात प्रवासी हार्बर मार्गावरून प्रवास करू शकतात.

शनिवारच्या रद्द लोकल
रा. 9.54 वा. सीएसएमटी ते कल्याण
रा.11.05 वा. कल्याण ते सीएसएमटी

 रविवारच्या रद्द लोकल
रा.12.28 सीएसएमटी-ठाणे
रा.12.31 सीएसएमटी-कुर्ला
प.5.40 सीएसएमटी-अंबरनाथ
प.4.40 ठाणे-सीएसएमटी
प.4.11 अंबरनाथ-सीएसएमटी
प.4.41 कल्याण-सीएसएमटी
प.5.54 कुर्ला-सीएसएमटी
स.6.15 कल्याण-सीएसएमटी