कोणताही सोहळा शानदार करा!

आई, वडिलांची इच्छा असतेच की, आपल्या मुलाचं-मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं. साहजिकच त्यासाठी खिसा रिकामा करायची त्यांची तयारी असते. पण अभिषेक कदम आणि प्रतीश आंबेकर या दोन मराठमोळ्या तरुणांनी ठाण्यात आलिशान लग्नसमारंभाची हमी देतानाच खिशातला पैसा वाचवून देणारा एक नवीन व्यवसाय सुरू केलाय.

लग्न असो की एखादा कॉर्पोरेट इव्हेंट, त्यासाठी एक चकाचक, सर्व सुखसोयींनी सुसज्ज असा हॉल लागतोच. पुन्हा प्रत्येक आयोजकाला तो आपापल्या आवडीनिवडीने सजवायचा असतो. आपल्या कार्यक्रमाला वा लग्नाला आपला टच असावा, असं प्रत्येकालाच वाटतं. ग्राहकांची नेहमी हीच गरज ओळखून त्यांनी ठाण्यातल्या आर मॉलमध्ये रिट्झ बॅक्वेट हा व्यावसायिक उपक्रम सुरू केलाय. फक्त ५० जणांपासून ते १५०० लोकांपर्यंतचा कोणताही कार्यक्रम इथे होऊ शकतो. २१ हजार चौरस फुटांच्या रिट्झ बॅंक्वेटमध्ये म्हणूनच आम्ही सर्व सोहळे आयोजित करतो, अशी माहिती रिट्झ बॅंक्वेटचे संचालक अभिषेक कदम यांनी दिली. कोणत्याही इव्हेंट किंवा कॉन्फरन्स, प्रदर्शन यांसाठी लागणाऱया सर्वच्या सर्व सुविधा एका छताखाली देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती रिट्झ बॅंक्वेटचे व्यवस्थापकीय संचालक प्रतीश आंबेकर यांनी दिली.

व्हीजेटीआयमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असतानाच आम्ही अनेक उपक्रमांच्या आयोजनात सक्रिय सहभाग घ्यायचो. त्यातूनच इव्हेंट मॅनेजमेंटची गोडी निर्माण झाली, यातच व्यवसाय करायचा निर्णय आम्ही घेतला. – अभिषेक कदम, प्रतीश आंबेकर