पहाटे फिरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण पळवले


सामना अॉनलाईन,लातूर

पहाटे फिरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकलस्वाराने पळवल्याची घटना उदगीर येथे घडली.
या प्रकरणी उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात शकुंतलाबाई उध्दवराव शिवदे पाटील यांनी तक्रार दाखल केली. शेजारच्या महिलेला सोबत घेऊन फिर्यादी या पहाटे फिरण्यासाठी गेलेल्या होत्या. साडे पाच वाजण्याच्या सुमारास चेहर्यावर दस्ती बांधून आलेल्या मोटारसायकल स्वाराने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे १३ ग्रॅमचे मिनी गंठण चोरुन पळून गेला. मोटारसायकलवर नंबर प्लेटही नव्हती. त्याच्या अंगावर पांढर्या रंगाचा शर्ट होता व तोंडाला पांढर्या रंगाचा रुमाल त्याने बांधलेला होता. पोलीसांनी अज्ञात मोटार सायकलस्वाराविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. उदगीर शहरात वाढत्या अशा घटनांमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.