लिंगायत समाजाच्या वतीने नगर पंचायतीच्या विरोधात चाकूर बंद

3

सामना प्रतिनिधी । चाकूर

जगत् ज्योती महात्मा बस्वेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सव समीतीच्या वतीने शहरात लावण्यात आलेल्या बॅनरला नगरपंचायतीच्या वतीने आकारण्यात आलेला दंड भरण्यास तयार असताना ही नगरपंचायतीने आकसापोटी जयंती महोत्सव समीतीच्या अध्यक्षांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याच्या निषेधार्थ येथील समस्त लिंगायत समाजाच्या वतीने चाकूर बंदचे आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत गुरूवारी व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बाजारपेठ बंद ठेवली.

चाकूर येथे जगत् ज्योती महात्मा बस्वेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने महात्मा बस्वेश्वर यांचे फोटो व वचन साहित्य असलेले बॅनर, फलक, स्वागत कमानी उभारल्या आहेत. या कमानी, बॅनर अनाधिकृतपणे लावल्यामुळे नगर पंचायतीच्या वतीने जयंती महोत्सव समितीला दंड आकारण्यात आला होता. महोत्सव समितीने नियमाप्रमाणे दंड भरण्यास तयार आहे. थोडा वेळ द्यावा अशी लेखी विनंती केली होती. परंतु दंड आकारल्या दिवशीच आकसापोटी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अॅड.युवराज पाटील यांच्या विरूद्ध नगर पंचायतीने पोलिसात गुन्हा दाखल केला. त्याच्या निषेधार्थ समस्त लिंगायत समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी यांना निलंबित करण्यात यावे, जयंती महोत्सव समीतीच्या अध्यक्षाविरूध्द दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, नगरपंचायतीच्या ठरावानुसार मुख्य प्रवेशद्वारार जगत् ज्योती महात्मा बस्वेश्वर यांचे नाव देण्यात यावे आदी मागण्याचे निवेदन तहसीलदार डॉ. अरविंद नरसिकर यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष मिलींद महालिंगे, माजी उपनगराध्यक्ष विलासराव पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुभाष काटे, खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन राधाकीशन तेलंग, अहमदपूर प.स.च्या सभापती आयोध्याताई केंद्रे, माजी नगराध्यक्ष डॉ. सिध्दार्थ सुर्यवंशी, माजी सभापती माधवराव कोळगावे, प.स.सदस्य महेश वत्ते, भाजपाचे तालुकाध्यक्ष मेघराज बाहेती, बालाजी सुर्यवंशी, सुरेश हाके, गणेश फुलारी, अॅड. श्रीधर सोनटक्के, शिवप्रसाद शेटे, दत्ता आलमाजी, अॅड. युवराज पाटील, सागर होळदांडगे, सुरज शेटे, शिवदर्शन स्वामी, आमोल हाळे, सोमेश्वर शेटे, रवी पटणे, संतोष फुलारी, विश्वनाथ कस्तुरे, दिपक पाटील, सहदेव होनाळे, विश्वंभर स्वामी, दत्ता अलमाजी, अमोल शेटे, सुधाकर हामने, नीलेश डुमने, योगेश कोरे, शैलेश कोडे, दत्ता सोनटक्के, प्रसाद स्वामी, हकानि शेख, सतीश पाटील, अमित वाडकर, प्रशांत अस्टके, हनमंत रायफले, ओम रायफळे, वर्धमान कांबळे, रियाज पठाण, आसिफ रेलवाले, विश्वनाथ पाटील, माधव तरगुडे, गणेश स्वामी, गोपाळ साखरे आदी उपस्थित होते.