ठाण्यात दिवाळी रोषणाईतून उजळला ‘चलो अयोध्या’चा नारा

3

सामना ऑनलाईन, ठाणे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राममंदिर उभारण्यासाठी ‘चलो अयोध्या’चा नारा दिल्यानंतर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दिवाळीनिमित्त सध्या सर्वत्र लखलखाट सुरू असून ठाण्याच्या दीपोत्सवातदेखील ‘चलो अयोध्या’चाच नारा उजळला. कशीश पार्क येथील सिद्धिविनायक मंदिर हजारो पणत्यांनी तेजोमय झाले आहे. या रोषणाईत दिवाळीच्या शुभेच्छा देत असतानाच ‘चलो अयोध्या’चीदेखील हाक देण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत राममंदिर उभारणारच, असा निर्धार करण्यात आला आहे. शिवसेना शाखा व सिद्धिविनायक सेवा समितीच्या वतीने ही रोषणाई केली असून ती पाहण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली आहे.