Champions League मँचेस्टर युनायटेड भिडणार बार्सिलोनाला

सामना ऑनलाईन,  लंडन

चॅम्पियन्स लीग या जागतिक फुटबॉलमधील मानाच्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती निश्चित करण्यात आल्या आहेत. अंतिम आठ संघांमध्ये 9, 10 एप्रिल आणि 16 व 17 एप्रिल या तारखांना दोन्ही लीगच्या लढती होतील. मँचेस्टर युनायटेड व बार्सिलोना या दोन स्टार संघांमध्ये उपांत्यपूर्व लढत होणार आहे. तसेच एजॅक्स-युवेण्टस, लिव्हरपूल-पोर्टो, टोटेनहॅम-मँचेस्टर सिटी यांच्यामध्ये इतर तीन लढती रंगतील.