पत्नीला वाऱ्यावर सोडून देणारे मोदी कुटुंबव्यवस्थेचा मान राखता काय?-चंद्राबाबू

2
chandrababu-naidu-modi-wife

सामना ऑनलाईन । अमरावती

मोदीजी, तुम्ही पत्नीला वाऱ्यावर सोडून दिलेले आहे. कुटुंबव्यवस्थेचा मान तुम्ही राखता काय, असा तिखट सवाल मुख्यमंत्री चंदाबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना आज केला. ते विजयवाडा येथील सभेत बोलत होते.

मोदी यांनी गुंटूर येथील सभेत नायडू यांचा उल्लेख ‘लोकेशचा बाप’ असा केला होता. त्यावर ‘मोदीजी, तुम्ही माझ्या मुलाविषयी बोललात, म्हणून तुमच्या पत्नीचा उल्लेख करणे मला भाग पडले आहे’, असे सांगून चंदाबाबू सभेत म्हणाले की, मोदी यांना पत्नी आहे हे तुम्हाला माहीत आहे काय? त्यांच्या पत्नीचे नाव जशोदाबेन असे आहे. मोदी यांना कुटुंब, मुलेबाळे नाहीत. मला मात्र कुटुंब, मुलेबाळे असून मी त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांचा आदर करतो, असे नायडू यांनी सांगितले. मोदी हे पंतप्रधान राहण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांनी गुजरातमधील त्यांच्या गावी निघून जावे. यासाठीच आम्ही त्यांना आज ‘मोदी, गो बॅक’ केले, असे चंदाबाबू म्हणाले.