कोळसा खदानीत स्फोट, कामगार जखमी

प्रतिकात्मक छायाचित्र

सामना प्रतिनिधी। चंद्रपूर

येथील भटाळी खुल्या खदानी मध्ये डिटोनेटरचा स्फोट होऊन रमेश बालाजी इटनकर नामक कामगार जखमी झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

चंद्रपूर येथून काही किलोमीटर अंतरावर भटाळी खुल्या खदानी मध्ये स्फोटासाठी डिटोनेटरचा वापर केला जातो, दरम्यान कामगार रमेश इटनकर डीटोनेटर असलेला बॉक्स घेऊन जात असताना अचानक मोठा स्फोट झाला, या स्फोटामध्ये इटनकर गंभीररीत्या जख्मी झाले, स्फोट घडताच परिसरातील कामगाराने जखमींला वेकोली रुग्णालयात दाखल गेले त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले.या घटनेमुळे कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.