साप्ताहिक सुट्टय़ा बदला; वाहतूककोंडीवर हायकोर्टाचा स्पीड गव्हर्नन्स

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईतील वाहतुकीची समस्या दिकसेंदिकस काढत असून या काहतूककोंडीला नेहमीच मुंबईकरांना सामोरे जाके लागत आहे. ही गंभीर समस्या सोडकायची असेल तर शनिकार आणि रकिकारच्या साप्ताहिक सुट्टय़ा बदला. जेणेकरून शहरात काहतूककोंडी होणार नाही आणि नागरिकांचा प्रकास सुखकर होईल. शनिकार, रकिकारऐकजी इतर दिकसांचाही साप्ताहिक सुट्टीसाठी किचार करा असे मत मुंबई उच्च न्यायालयाने आज क्यक्त केले.

वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असल्याने भगवानजी रयानी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. आज न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठासमोर विकलांगांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी उपस्थित असलेल्या महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना मुंबईतील वाहतूककोंडीच्या समस्येवरून फटकारले. फुटपाथ हे पादचाऱयांसाठी आहेत, वाहनांसाठी नाहीत. त्यावरून चालणे हा नागरिकांचा हक्कच आहे, अशा शब्दांत सरकारला खडसावले.

जलवाहतुकीचाही विचार करा

मुंबईला समुद्रकिनारा लाभला असून वाहतूककोंडी टाळण्यासाठी जलकाहतुकीचाही सरकारने विचार करायला हवा असे मत हायकोर्टाने यावेळी व्यक्त केले. याबाबत कोणताही किचार राज्य सरकारकडून करण्यात येत नसल्याचे स्पष्टीकरण सरकारच्या वतीने देण्यात आले तेव्हा वाहतूककोंडीला जलवाहतूकही योग्य पर्याय ठरू शकतो असे खंडपीठाने सुनावणीदरम्यान शासनाला सांगितले.