‘जाडूबाई..’ आता भेटणार नवीन वेळेला..

78

सामना ऑनलाईन । मुंबई

धकाधकीच्या जीवनात जेवढी दगदग वाढतेय तेवढीच मनोरंजनाची भूक वाढत चालली आहे. त्यामुळे रसिकांची हीच गरज लक्षात घेऊन झी मराठीने संध्याकाळी मनोरंजनाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २७ नोव्हेंबरपासून दुपारी १ वाजता प्रक्षेपित होणारी ‘जाडूबाई जोरात’ ही मालिका संध्याकाळी ६ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. दररोज संध्याकाळी ६.३० वाजता होम मिनिस्टरपासून सुरु होणाऱ्या या मनोरंजनाच्या यात्रेचा शुभारंभ आता संध्याकाळी ६ वाजल्यापासून ‘जाडूबाई’ अगदी जोरात करतील.

वेगवेगळ्या विषयांचं कल्पक सादरीकरण हे झी मराठी वाहिनीचं वैशिष्ट्य! ‘जाडूबाई जोरात’ ही मालिका याचं उत्तम उदाहरण! निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे अशा दोन दिग्गज अभिनेत्रीच्या अभिनयाची जुगलबंदी सध्या चांगलीच रंगात आली आहे. मालिकेने सुरुवातीपासूनच रसिकांच्या मनाची पकड घेतली होती. नव्या वेळेत मालिकेची हीच पकड आता अधिक घट्ट होईल, अशी आशा मालिकेची टीम व्यक्त करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या