पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात ऐनवेळी बदल

43

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला जेमतेम 10 दिवस राहिले असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सोमवारी आपल्या वर्ल्ड कप संघात बदल बदल केला. वहाब रियाज व मोहम्मद आमीर या वेगवान जोडगोळीसह फलंदाज असिफ अलीचाही पाकिस्तानच्या 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे.

संघनिवड समितीचे प्रमुख इंझमाम उल-हक यांनी ही माहिती दिली. या तीन गोलंदाजांना वर्ल्ड कप संघात स्थान देताना ‘पीसीबीने आबिद अली, फहीम अश्रफ व जुनैद खान यांना डच्चू दिला. 33 वर्षीय वहाब रियाजने दोन वर्षांनंतर पाकिस्तानच्या संघात पुनरागमन केले. या वेगवान गोलंदाजाने जून 2017 मध्ये अखेरचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. असिफ अलीच्या दोनवर्षीय मुलीचे रविवारी कर्करोगाने निधन झाले.

आपली प्रतिक्रिया द्या