चाणक्यनीती

 

  •  तीच व्यक्ती समजूतदार आणि यशस्वी आहे, जिला वर्तमान काळ कसा चालू आहे असे आचार्य चाणक्य सांगतात.. सुखाचे दिवस असतील तर चांगले काम करत राहावे आणि दुःखाचे दिवस असतील तर चांगल्या कामांसोबतच धैर्य, संयम बाळगणे आवश्यक आहे. जी व्यक्ती शक्ती नसतानाही मनातून हार मानत नाही. तिला कोणीही हरवू शकत नाही.
  •  आपले खरे मित्र कोण आहेत. मित्राच्या वेशात शत्रू कोण आहे हे आपल्याला माहीत असावे. शत्रूला आपण ओळखत असतो. मात्र मित्र वेशात लपलेल्या शत्रूची ओळख पटणं आवश्यक आहे. मित्राच्या वेशात लपलेल्या शत्रूला ओळखू शकलो नाही तर कार्यात अपयश मिळते.
  • कोणतेही काम उद्यावर सोडू नका. कारण दुसऱ्या क्षणी काय होईल कोणाला माहीत ? त्यामुळे तुम्ही आखलेली योजना कोणालाही सांगू नका. योजना गुपित ठेवा.
  •  कोणत्याही कामाला एकदा सुरुवात केली की त्यातून यश मिळेल की अपयश असे विचार करू नका. थोडक्यात अपयशाला घाबरू नका.
  •  जे काही कर्म कराल ते वेगाने आणि मन लावून करा. हे सिंहाकडून शिकण्यासारखे आहे.
  •  स्वतःची कमजोरी कधीही कोणालाही सांगू नका. जी व्यक्ती स्वतःची शक्ती कमी असतानाही मनातून हार मानत नाही, तिला कोणीही हरवू शकत नाही. ताकदीपेक्षा जास्त काम हातामध्ये घेतल्यास त्यामध्ये अपयश पदरी पडण्याची शक्यता असते.