सॅमसंगच्या प्रमुखाची जेलमध्ये रवानगी

सामना ऑनलाईन, सेऊल

इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्मिती करणारी आणि जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी सॅमसंगच्या अध्यक्षाची रवानगी जेलमध्ये करण्यात आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. लाचखोरीच्या आरोपाखाली जे.वाय.ली यांना अटक करण्यात आली आहे, त्यांनी दक्षिण कोरीयाच्या राष्ट्रपतींनाच लाच देण्याचा प्रयत्न केला.

ली यांना एका छोट्याशा कोठडीमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांना इतर कैद्यांसोबत भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ली यांना ठेवण्यात आलं आहे ती कोठडी राजकारण्यांना आणि उद्योगपतींना नजरकैदेत ठेवण्यासाठी वापरण्यात येते. या लाचखोरी प्रकरणातील अन्य आरोपींना त्याच तुरूंगात ठेवण्यात आलं आहे ज्या तुरूंगात ली यांना ठेवण्यात आली आहे. जर या आरोपींशी ली यांचा संपर्क झाला तर ते संगनमताने पुरावे नष्ट करू शकतील अशी पोलिसांना भीती वाटत आहे. त्यामुळेच ली यांना कोणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे.

सॅमसंग कंपनीचे अध्यक्ष ली हे ६.२ अब्ज डॉलर्सचे मालक आहेत. सॅमसंग ही मोबाईल निर्मिती, टीव्ही निर्मिती आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीमधील अग्रणी कंपनी आहे