चतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ

सामना ऑनलाईन । मुंबई

महावीर प्रसाद मोरारका स्मृती चषक महाराष्ट्र राज्य शालेय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या 6 वर्षांखालील मुलींमध्ये चतुर्थी परदेशीने सर्वाधिक 8 गुण घेत गटविजेतेपद पटकावले. द्वितीय क्रमांकासाठी आरना शाह व स्वरा राईलकर यांनी समान 7 गुण घेतल्यामुळे उत्तम सरासरीच्या बळावर आरना शाह उपविजेती ठरली. 6 वर्षांखालील मुलांमध्ये प्रथम मानांकित विराज राणेने सर्वाधिक 8 गुण घेत गटविजेतेपद जिंकले. विजेत्यांना पुरस्कार बुद्धिबळप्रेमी मोरारका, साऊथ मुंबई चेस असोसिएशनचे सीईओ दुर्गा नागेश गुत्तुला, दिगी पोर्टचे सीएमडी विजय कलंत्री, इंडियन चेस स्कूलचे संस्थापक प्रफुल झव्हेरी, फिडे मास्टर बालाजी गुत्तुला यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.