कर्करोगाच्या नावाखाली व्यावसायिक महिलेची फसवणूक करणारी अटकेत

21

सामना प्रतिनिधी । मुंबई

कर्करोगाच्या नावाखाली व्यावसायिक महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक करणाऱ्या महिलेला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. दाविना डेव्हिड बेनेट ऊर्फ दाविना कौर असे तिचे नाव आहे. ती सध्या पोलीस कोठडीत आहे.

तक्रारदार या ओशिवरा परिसरात राहतात. त्यांचा फ्लॉअर शॉप आहे. काही दिवसांपूर्वी त्याची दाविनासोबत ओळख झाली होती. गेल्या डिसेंबरमध्ये दाविना तक्रारदाराच्या दुकानात आली. आपल्याला केमोथेरॅपी घायची आहे, पण एटीएम ब्लॉक झाले असे तक्रारदार महिलेला सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने तिला 30 हजार रुपये दिले. त्यानंतर दाविनाने आपल्या मुलीचे निधन झाले असून अंत्यविधीकरिता पैसे नसल्याचे सांगून पैसे जमा करण्यास सांगितले. पैसे देण्यास दाविना टाळाटाळ करायची. याबाबत तक्रारदार महिलेने ओशिवरा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा नोंद केला. दाविना ही गोवा येथे असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गोव्यातून तिला ताब्यात घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या