31 लाखांची स्कोडा गाडी आठ लाखांत देते! महिलेच्या भामटेगिरीला पोलिसांचा ‘ब्रेक’

1

सामना प्रतिनिधी । ठाणे

महागडी स्कोडा गाडी शोरूमपेक्षा कमी किमतीत मिळकून देते, असे सांगून हॉटेल व्यावसायिकाला गंडा घालणाऱया भामटय़ा महिलेला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने बेडय़ा ठोकल्या आहेत. दीप्ती मुळीक असे या 34 कर्षीय महिलेचे नाव असून तिने हीच कार्यपद्धती कापरून भांडुपमध्ये 75 लाखांचा चुना लावला आहे. त्यामुळे या ठगसेन महिलेने कोणकोणत्या बडय़ा हस्तींना गंडा घातला आहे, त्याचा शोध सुरू आहे.

कळवा येथे राहणारे हॉटेल व्यावसायिक किरण शहा (40) यांना 31 लाख 56 हजारांची स्कोडा गाडी 8 लाख 50 हजारांत मिळकून देते, असे सांगत माहीमच्या दीप्ती मुळीक या महिलेने संपर्क साधला. या गाडय़ा शोरूमपेक्षा कमी किमतीत मिळकून देण्यासाठी माझ्या मोठमोठय़ा ओळखी असल्याची बतावणी करून दीप्तीने शहा यांच्याकडून दोन लाख 85 हजार उकळले. यावेळी दीप्तीने तीन लाखांची रिसीट किरण यांना व्हॉट्सअॅप केली असता ती रिसीट बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी युनिट एकशी संपर्क साधला असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने दीप्ती हिला ताब्यात घेतले.