चीझ-भाजी पराठा

साहित्य – १ कप मैदा, १ कप कणिक, ६ चमचे डालड्य़ाचे मोहन, पाऊण कप किसलेले चीझ, १ छोटासा फ्लॉवर, १ गाजर, १ वाटी मटारचे दाणे, १ कांदा, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, लहानसा आल्याचा तुकडा, २-४ लसणाच्या पाकळ्या, थोडासा पुदिना, कोथिंबीर

कृती – प्रथम सर्व भाज्या किसून घ्या. मटारचे दाणे आणि भाज्या थोडे मीठ घातलेल्या पाण्यात वाफवून घ्याव्यात. नंतर सर्व मिश्रण घोटून घ्यावे. पाणी अजिबात राहू देऊ नये. नंतर त्यात मीठ, मिरच्या, आले, आले, लसूण, पुदिना घालून मिश्रण ढवळावे. चीझही घालावे. नंतर मिश्रण थंड होऊ द्यावे. त्यानंतर पिठात थोडे मीठ आणि मोहन घालून पोळ्यांच्या कणकेसारखी कणिक भिजवावी. फुलक्याच्या आकाराच्या दोन पोळ्या करून मध्ये सारण पसरून कातण्याने कापून परोठे शेकावे. कडेने तूप सोडावे. हे परोठे चवीला सुंदर लागतात.