चीझ पराठा

सामना ऑनलाईन । मुंबई

साहित्य –
१ कप मैदा, १ कप कणीक, ६ चमचे डालडय़ाचे मोहन, पाव कप किसलेले चीझ, १ लहानसा फ्लॉवर, १ गाजर, १ वाटी मटारचे दाणे, १ कांदा, ३-४ हिरव्या मिरच्या, लहानसा आल्याचा तुकडा, २-४ लसूण पाकळ्या, थोडासा पुदिना, कोथिंबीर.

कृती –
प्रथम सर्व भाज्या किसून घ्या. मटारचे दाणे आणि भाज्या थोडे मीठ घातलेल्या पाण्यात वाफवून घ्याव्यात. नंतर सर्व मिश्रण घोटून घ्यावे. पाणी अजिबात राहू देऊ नका. त्यानंतर त्यात मीठ, मिरच्या, आले, लसूण, पुदिना वगैरे घालून मिश्रण ढवळून घ्यावे. चीझही घालावे. मिश्रण थंड होऊ द्यावे. पिठात थोडे मीठ व मोहन घालून पोळ्यांच्या कणकेसारखी कणिक भिजवावी. फुलक्याच्या आकाराच्या दोन पोळ्या करून, मधे सारण पसरून, कातण्याने कापून पराठे शेकावे. कडेने तूप सोडावे. उलटताना फार जपून, बेताने उलटावेत. हे पराठे चवीला फारच सुंदर लागतात.