डबोके, फ्रँक, हेंडरसन या तिघांना रसायनशास्त्राचे नोबेल

सामना ऑनलाईन । स्टॉकहोम

जॅक्स डबोके, ओकाईम फ्रँक, मायकल हेंडरसन या तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे यंदाचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. पदार्थांच्या जैव रेणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्याकरिता केलेल्या कार्यासाठी या तिघांना नोबेल देत असल्याचे नोबेल समितीने सांगितले.

मंगळवारी पदार्थ विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाले आणि आज (बुधवारी) रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहेत. डबोके, फ्रँक आणि हेंडरसन यांच्या संशोधनामुळे जैवरेणू गोठवून त्यांचा अभ्यास करणे हे संशोधकांना सोपे जाणार आहे.

१९०१ पासून आजवर रसायनशास्त्रासाठी १०९ नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये १७० पेक्षा जास्त वैज्ञानिकांचा समावेश आहे. नोबेल पुरस्कार आल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने दिला जातो. आल्फ्रेड नोबेल स्वतः रसायनशास्त्रज्ञच होते.

  • फ्रेडरिक सँगर या ब्रिटीश बायोकेमिस्टला १९५० ते १९८० या दरम्यान दोनवेळा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
  • साहित्यातील नोबेल ५ ऑक्टोबर रोजी होणार
  • शांततेचे नोबेल ६ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार

nobel