छगन भुजबळ यांना हायकोर्टाचा दिलासा, राज्याबाहेर जाण्याची परवानगी

4 मे छगन भुजबळांना सव्वा दोन वर्षानंतर जामीन मंजूर

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्र सदनासह इतर आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी जामीन मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना राज्याबाहेर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र बाहेर जाण्यापूर्वी त्यांना तपास अधिकाऱ्याला त्याची माहिती देणे बंधनकारक असेल असे उच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे.

मनी लाँडरींग प्रकरणात जामीन मिळाल्यानंतरही छगन भुजबळ यांना राज्याबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. तशी परवानगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने अटींसह परवानगी दिली आहे. त्यामुळे भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे.