शिवसेनाप्रमुखांचा जीवनप्रवास जाणून घेण्यासाठी ‘ठाकरे’ चित्रपट प्रत्येकाने पाहावा!

7
chhagan-bhujbal

सामना प्रतिनिधी । नाशिक

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास जाणून घेण्यासाठी, त्यांनी केलेला संघर्ष, जागृत केलेला महाराष्ट्र, घेतलेले कष्ट आणि शिवसेना कशी निर्माण झाली, कशी वाढली, हे समजून घेण्यासाठी ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रत्येकाने पाहायला हवा, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ‘ठाकरे’ या चित्रपटाचे कौतुक केले.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत निर्मित ‘ठाकरे’ या चित्रपटाचा खास शो रविवारी राष्ट्रवादीतर्फे बिगबझारच्या सिनेमॅक्स चित्रपटगृहात आयोजित केला होता. तुताऱयांच्या निनादात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचे स्वागत केले. चित्रपट पाहिल्यानंतर ते म्हणाले की, या चित्रपटातील आंदोलने पाहून माझ्या जुन्या स्मृती जाग्या झाल्या. नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी शिवसेनाप्रमुखांची भूमिका उत्तम वठविली आहे. या सिनेमाकडे कुणी बाजीराव मस्तानी, पद्मावत या सिनेमांच्या दृष्टीकोनातून पाहू नये. हा सिनेमा शिवसेनाप्रमुखांच्या जीवनावर आधारित आहे. शिवसेना कशी निर्माण झाली, कशी वाढली हे समजण्यासाठी प्रत्येकाने हा सिनेमा पाहायला पाहिजे. या सिनेमात शिवसेनाप्रमुखांच्या आवाजातील करारीपणा निश्चितपणे दिसून येतो. त्यामुळे मी जे पाहत होतो ते फक्त शिवसेनाप्रमुखांनाच पाहत होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना मजबुतीने उभी राहिली!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे अशक्य आहे; परंतु त्यांच्या पश्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांचा वारसा मजबुतीने पुढे नेत आहेत. शिवसेना संपली असे सर्वजण म्हणत होते, तेव्हा मी एकटाच शिवसेना संपणार नाही, असे सांगत होतो आणि तेच खरे आहे. शिवसेनेची पाळेमुळे खोलवर रूजलेली असल्याने ती संपणार नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पश्चातही ती उभी राहिली आहे. शिवसेनाप्रमुख आज असते तर अमीत शहासारख्यांची पटक देंगे म्हणण्याची ताकदही झाली नसती, असा टोलाही छगन भुजबळ यांनी भाजपाला हाणला. शिवसेनेने नेहेमीच राष्ट्रपतीपदासह महत्त्वाच्या पदांसाठी मराठी माणसाबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

2 प्रतिक्रिया

  1. Chaganrav badasaheb yanchya virudh padhivar var karnare ……he aata mitra paksha virudh udhavjina bhadkavat Aahe
    ……. Savdhan uddhavji adchanit Bjp la hej rastrawadi sath detat ….. He Hindu virodhi kase Bjp aani Shena madhe bhandane lavayche …..kadhi Bjp la pathinba kadhi shevsenala changale bolayache… ……. He begadi log Aahet ….. Hey Amit Shah shivshena barobar rahile ….aani hej Chagan padhivar var kerun ….. Aaj shenache RPI banau pahat Aahe….. Savdhan

  2. लखोबाच्या ढुंगणावर लाथ मारण्याचा प्रसंग आहे का चित्रपटात?
    छग्याची औकात ती काय? शिवसेनाप्रमुखांच्या चपलेशी बसायचीही लायकी नाही व नव्हती याची.
    म्हणूनच बूट मिळाला!
    आता मारे पश्चात्तापाचे कढ येत आहेत.