चिखलोली तलाव होणार पुन्हा जिवंत

42

सामना प्रतिनिधी । बदलापूर

बदलापूरकरांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी शिवसेनेच्या मदतीने चिखलोली तलाव पुन्हा जिवंत होणार आहे. या गाळ काढण्याच्या कामाला महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर सुरुवात होणार आहे.

बेलवलीजवळील चिखलोली तलाव हा एक ऐतिहासिक तलाव असून येथील गाळ काढण्याचे काम अनेक वर्षे न झाल्याने यातील पाणी साठवण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. ही बाब नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांच्या लक्षात आल्यानंतर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हात्रे यांनी तलाव पुनर्जीवित करण्याचा निश्चय केला. त्यानुसार उद्या १ मे रोजी तलावातील गाळ. श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार डॉ.बालाजी किणीकर, खासदार डॉहेत.

सुशोभिकरण होणार
येत्या महिन्याभरात चिखलोली तलावातील गाळ काढून त्याच्या शेजारी नवीन छोटासा मूर्ती विसर्जन तलाव बांधण्यात येणार आहे. तसेच अन्य धार्मिक विधी करण्यासाठी तलावाजवळ खोल्या बांधण्यात येणार आहेत. या ऐतिहासिक तलावाचे सुशोभिकरण करून पर्यटनस्थळ निर्माण करणार असल्याचे नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या