विसर्जनावेळी २ सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

सामना प्रतिनिधी । हडपसर

गणपती विसर्जन सुरू असताना संध्याकाळी साडेपाच वाजता पुणे-सासवड रस्त्याजवळ वडकी येथील गायदरा तलावात रोहित सतीश जगताप (१३) आणि ओमकार सतीश जगताप (९) या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघेही वडकी भागातील रहिवासी होते.

विसर्जनाला गेलेली पाच मुले पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे बुडाली. त्यापैकी तीन मुलांना स्थानिकांनी वाचवले. मात्र रोहित आणि ओमकारचा मृत्यू झाला. तब्बल दोन तासांच्या शोध मोहिमेनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.