हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू

सामना प्रतिनिधी। मुंबई

मालवणी मढ येथील एका हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. इद्रिस असे त्या मुलाचे नाव असल्याचे समजते. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात संबंधित हॉटेलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मढ येथे पंचतारांकित रिसोर्ट असून तेथे इद्रिस त्याच्या कुटुंबियांसोबत पिकनिकनिमित तेथे गेला होता. दरम्यान, रिसॉर्टमधील स्विमिंगपूलमध्ये इद्रिसचा मृतदेह सापडला. इद्रिस स्विमिंगपूलमध्ये कसा पडला. तेथे कोणी जीवरक्षक तैनात का नव्हता. तो पडला की त्याला कोणी स्विमिंग पूलमध्ये ढकलले याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नसून पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत. इद्रिस हा खार येथील शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता.