कृतघ्न! 80 वर्षांच्या आईला रस्त्यावर सोडून मुले पसार

6

सामना ऑनलाईन। मथुरा

मुलांच्या आनंदासाठी आई तिचं सगळं आयुष्य पणाला लावते. मुलांना काय हवं नको ते पाहण्यासाठी ती संपू्र्ण आयुष्य खर्ची करते. पण याची परतफेड करण्याऐवजी मुलांनी जर आईलाच घरातून बाहेर काढलं तर असा विचार जरी मनात आला तरी संतापाचा भडका होतो. पण अशीच एक घटना मथुरा येथे घडली आहे. 80 वर्षाच्या आईला दोन मुलांनी रस्त्यावर सोडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पोलिसांनी सध्या या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे.

सोना देवी असे या वृद्धेचे नाव असून ती दोन मुलांसह मथुरा येथे राहत होती. पण दोन दिवसांपूर्वी मुलांनी आईला बेदम मारहाण केली. त्यानंतर ते तिला घेऊन वृंदावन येथे आले व तिथेच तिला रस्त्यावर सोडून ते निघून गेले. मुलं कामासाठी गेले असतील असे समजून महिलेने दोन दिवस रस्त्यावरचं काढले. पण कडाक्याच्या थंडीत गारठल्याने ती आजारी पडली. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना तिची दया आल्याने त्यांनी तिला जेवण दिले. तसेच रजई व काही चादरीही दिल्या. त्यानंतर काही जणांनी महिलेला तिचा पत्ता विचारला त्यावेळी तिने वृंदावन येथे राहत असल्याचे सांगत तिथे जाणाऱ्या बसमध्ये बसवून देण्याची विनंती नागरिकांना केली. एकाने तिला नोएडाला जाणाऱ्या बसमध्ये बसवले. पण महिला वाटेत मध्येच उतरली . त्यानंतर मनिष नावाच्या तरुणाने पोलिसांना कळवले. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले आहे.