राष्ट्रगीताचा अपमान केला, सोशल मीडिया स्टारची तुरुंगात रवानगी

1

सामना ऑनलाईन। बीजिंग

राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी चीनमधील एका सोशल मीडिया स्टारला पाच दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यांग कैली (20) असे तिचे नाव असून तिचे सोशल मीडियावर 4.5 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. यांग ने 7 ऑक्टोबरला एका लाईव्ह व्हिडीओमध्ये चीनचे राष्ट्रगीत ‘मार्च ऑफ द वॉलिंटियर्स’ गायले होते.पण तिचे उच्चार स्पष्ट नव्हते आणि ती त्यावेळी कंडक्टरप्रमाणे हातवारे करत होती. तिचे हे कृत्य राष्ट्रगीताचा अपमान करणारे होते. यामुळे तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी देशवासियांना ऑनलाईन व ऑफलाईन देशभक्ती व्यक्त करण्याचे आवाहन केले होते. 2017 सालापासूनच चीन सरकारने राष्ट्रगीताच्या अवमान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रगीता मधील शब्दांबरोबर छेडछाड करणाऱ्याला 15 दिवसांचा तुरुंगवास करण्याची कायदेशीर तरतूद केली होती. आता ही शिक्षा तीन वर्ष करण्याचा विचार चीन सरकार करत आहे.