हिंदुस्थानच्या जखमेवर चीनने मीठ चोळले, जैशचा म्होरक्या मसूदला पाठिंबा

सामना ऑनलाईन । बीजिंग

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 42 जवान शहीद झाले. पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. हिंदुस्थानचा शेजारी चीनने देखील याचा निषेध व्यक्त केला असला तरी ज्या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला त्याचा प्रमुख मसूद अझहर याची साथ दिली आहे. चीनने मसूद अझहरला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याच्या संयुक्त राष्ट्राच्या निर्णयाला नेहमीच खोडा घातला आहे. आताही ही मागणी चीनने साफ शब्दात फेटाळून लावत हिंदुस्थानच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

Pulwama attack तुम्ही प्रत्युत्तर द्या, रशिया सहकार्य करेल – पुतीन
Photo : तिरंग्यातील शहिदांचे पार्थिव पाहून तुमचेही डोळे पाणावतील

चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग गुआंग यांनी पुलवामा हल्ल्यावर शुक्रवारी प्रतिक्रिया दिली. ‘पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या बातमीने आम्ही सुन्न झालो आहोत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. दहशतवादाजी आम्ही कडक शब्दात निंदा करतो. दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी व शांतता राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करायला हवे’, असे गेंग गुआंग म्हणाले. यानंतर त्यांना मसूद अझहरला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी साफ शब्दात नकार दिला.

Pulwama Attack जैशचा कमांडर अब्दुल रशीद गाझी पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड

याआधी हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्राच्या सर्व सदस्यांना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याची मागणी पुन्हा एकदा केली. संयुक्त राष्ट्राच्या 1267 सॅक्शन समितीच्या अंतर्गत हिंदुस्थानने ही मागणी केली. तसेच पाकिस्तानमध्ये पोसलेल्या प्रत्येक दहशतवादी संघटनेने बंदी घालण्याचीही मागणी हिंदुस्थानने केली. परंतु संयुक्त राष्ट्राचा स्थायी सदस्य चीनने ही मागणी फेटाळून लावली.