चिनी प्रसारमाध्यमांनी ओकली गरळ, हिंदुस्थान स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारत आहे

सामना ऑनलाईन, बीजिंग

हिंदुस्थानने चीनच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. आमच्या देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाबाबत कोणताही समझोता करण्यात येणार नाही. आमच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून हिंदुस्थान स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे अशी गरळ चिनी प्रसारमाध्यमांनी ओकली आहे.

चीनच्या भागात हिंदुस्थानी सैनिक घुसखोरी करत आहे. तसेच या भागात सैन्याची कुमक हिंदुस्थान वाढवत आहे. हिंदुस्थानचा युद्ध करण्याचा विचार आहे काय, असा सवालही या माध्यमांनी केला आहे. चीनला कोणत्याही परिस्थितीत हिंदुस्थानशी युद्ध करायचे नाही. त्यामुळे आम्ही ही समस्या संयमाने सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र हिंदुस्थानने आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. चीनचे इशारे गंभीरतेने घेऊन डोकलाममधून सैन्याला माघारी बोलवावे असा खोचक सल्लाही माध्यमांनी दिला आहे.