हिंदुस्थानात फूट पाडण्याच्या तयारीत ड्रॅगन

सामना ऑनलाईन । बीजिंग

डोकलाम मुद्द्यावरून चीन हिंदुस्थानला शह देण्यासाठी अनेक कुटनितींचा अवलंब करत आहे. सतत चीनकडून हिंदुस्थानला युद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत, मात्र चीनच्या धमक्यांना हिंदुस्थाननं फारसं महत्त्व दिलेलं नाही. चीननं अनेक अयशस्वी प्रयत्नानंतर आता हिंदुस्थानात फूट पाडण्याचं षडयंत्र रचलं आहे. एका बाजुला फुटीरतावाद्यांना समर्थन देत आहे, तर दुसरीकडे डोकलाम आणि लदाखमधील परिस्थितीला हिंदुत्व जबाबदार असल्याचा आव आणला आहे.

चीनच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने आपल्या संपादकीयमध्ये लिहिलं आहे की, हिंदुस्थान नेहमीच तिबेटच्या स्वातंत्र्याचा समर्थक आहे. त्यामुळे हिंदुस्थानवर दबाव टाकण्यासाठी चीनला फुटीरवाद्यांना समर्थन देणं गरजेचं आहे. हिंदुस्थानात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. त्यामुळे त्यांच्यात फूट पाडले सहज शक्य आहे. १९४७मध्ये हिंदुस्थानचं विभाजनही अशाचप्रकारे झालं होतं. त्यामुळे चीनच्या या हल्ल्यापासून हिंदुस्थानला सावध राहण्याच गरज आहे.