पाकड्यांना चीनचा दणका; एअरक्राफ्ट कॅरिअर विकणार नाही

9


सामना ऑनलाईन । बिजींग

चीन पाकिस्तानला एअरक्राफ्ट कॅरिअर ‘लाउनिंग’ विकणार असल्याचे वृत्त रविवारी प्रसिद्ध झाले होते. चीनकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले असून चीन पाकिस्तानला कोणतेही एअरक्राफ्ट कॅरिअर विकणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चीनचे हे पहिले आणि एकमेव एअरक्राफ्ट कॅरिअर आहे. त्याचा अजूनही वापर करण्यात येतो. त्यामुळे ते विकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे चीनने स्पष्ट केले आहे. तसेच दुसऱ्या देशांना जहाज विकण्यासाठी काही नियम आणि सिद्धांत आहेत, त्याचे पालन करावे लागते, चीन कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणार नाही, असेही चीनने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानातील एका वृत्तपत्राने चीनी आणि रशियाच्या प्रसारमाध्यमांचा हवाला देत चीन पाकिस्तानला एअरक्राफ्ट कॅरिअर विकणार असल्याचे वृत्त दिले होते. पाकिस्तानी नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी माफक किंमतीत चीन पाकिस्तानला हे जहाज विकणार असल्याचे वृत्तात म्हटले होते. चीनच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचे नौदल सामर्थ्य हिंदुस्थापेक्षा अनेक पटींनी वाढणार आहे. लाऊनिंगमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान विकसीत करून ते जहाज चीन पाकिस्तानला विकणार असल्याचे वृत्तात नमूद केले होते. पाकिस्तानचे आणि चीनचे संबंध चांगले आहेत. चीन पाकिस्तानसाठी अद्ययावत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली चार जहाजे बनवत असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत आपल्याला माहिती नाही. मात्र, आमच्याकडे एकमेव एअरक्राफ्ट कॅरिअर आहे. ते विकण्याचा आमचा विचार नाही असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनाइंग यांनी स्पष्ट केले. नौदलाची जहाचे विकण्यासाठी काही नियम आणि सिद्धांत आहेत. आमच्याकडून त्याचे पालन करण्यात येते असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एअरक्राफ्ट कॅरिअर आणि कोणतीही जहाजे चीन पाकिस्तानला विकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रसिद्ध झालेले वृत्त खोडसाळपणाचे असून त्यात तथ्य नाही. चीनकडे एकमेव एअरक्राफ्ट कॅरिअर आहे. तसेच पाकिस्तानला विकण्यासाठी आमच्याकडे अतिरिक्त जहाजे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चीन पाकिस्तानसाठी कोणतीही जहाजे बनवत नसल्याचेही त्यांनी सांगितले. चीनमध्ये सध्या एअरक्राफ्ट कॅरिअर बनवण्याचे काम सुरू आहे. 2035 पर्यंत चीनकडे अद्ययावत आणि अत्याधुनिक एअरक्राफ्ट कॅरिअर असतील. त्यातील दोन एअरक्राफ्टवर अण्वस्त्र वाहण्याची क्षमता असेल. मात्र, चीनकडून या योजनेबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या