ट्रम्पसाठी एका रात्रीत ड्रॅगनने हटवले आकाशातील धुके

सामना ऑनलाईन । बीजिंग

दिल्लीप्रमाणेच चीनची राजधानी बीजिंग येथे धुक्याने कहर केला होता. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बुधवारी चीन दौऱ्यावर येणार होते. या दौऱ्यात अडथळा नको म्हणून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रॅगनने एका रात्रीत आकाशात पसरलेले हे धुके हटवल्याचे समोर आले आहे.

दिल्लीप्रमाणेच गेल्या चार दिवसांपासून बीजिंगमध्येही वायूप्रदूषणामुळे धुके दाटून आले होते. यामुळे घरातून बाहेर पडणेही नागरिकांना अशक्य झाले होते. त्यातच बुधवारी ट्रम्प चीन दौऱ्यावर येणार असल्याने अधिकारी वर्गही चिंतेत होता. हवाईमार्गाने ट्रम्प येणार होते. यामुळे आकाश निरभ्र असणे गरजेचे होते. यामुळे चीनच्या तंत्रज्ञांनी नव्या तंत्राचा उपयोग करत मंगळवारी रात्रीच हवेत पसरलेले धुके हटवण्यास सुरुवात केली. सकाळपर्यंत आकाश निरभ्र झालं. त्यानंतर ट्रम्प यांचे आगमन झाले.

चीनच्या धर्तीवर धुके हटवण्यासाठी दिल्लीतही तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा अशी मागणी होत आहे.