चीनचे पहिले स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळणार ?

सामना ऑनलाईन। बीजिंग

चीनचे पहिले स्पेस स्टेशन Tiangong-1 हे अनियंत्रित झाले असून ते पृथ्वीवर कोसळणार आहे. ८.५ टन वजन असलेले हे स्पेस स्टेशन घातक रसायनांनी भरलेले आहे. यामुळे ते पृथ्वीवर कोसळल्यानंतर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम होणार असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. २४ मार्च ते १८ एप्रिल या दरम्यान हे स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता चीनच्या अंतराळ संस्थेने व्यक्त केली आहे.

युरोपमधील अंतराळ संस्थेनेही याला दुजोरा दिला आहे. अॅरोस्पेस कॉर्पोरेशन या संस्थेने मात्र Tiangong-1 एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पृथ्वीवर कोसळणार असल्याचे म्हटले आहे. चीनच्या अंतराळ संस्थेने दिलेल्या माहितीनुसार हे स्पेस स्टेशन उत्तर चीन, मध्य इटली, उत्तर स्पेन, याबरोबरच अमेरिका, न्यूझीलँड,तस्मानिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये कोसळण्याची अधिक शक्यता आहे.