मंगळावर उगवणार बटाटे; कसे ते वाचा..

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

चीनने मंगळावर जीवसृष्टी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून चीनने मंगळावर बटाट्यांचं उत्पादन घ्यायचं ठरवलं आहे. याशिवाय मंगळावर रेशीम तयार करणाऱ्या किड्यांची पैदासही करण्याचा चीन प्रयत्न करणार आहे. पुढच्या वर्षी चीनचे एक अंतराळयान खास या उत्पादनाच्या मोहिमेसाठी चंद्रावर जाणार आहे. एका जागतिक अंतराळ संशोधनविषयक परिषदेत चीनतर्फे ही माहिती देण्यात आली.

चीनमधील एका विद्यापीठात याबाबतचं संशोधन करण्यात येत आहे. या विद्यापाठाच्या शास्त्रज्ञांनी मंगळावर बटाट्याचं उत्पन्न घेण्यासाठी खास तंत्रज्ञान विकसित केले आहे. याच संशोधनाअंतर्गत चंद्रावर तीन किलो वजन असलेले सजीव जिवंत राहू शकतील यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. रेशीम उत्पन्न करणारे किडे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात. बटाट्याचं झाड ऑक्सिजन तयार करतं. हे दोन्ही वायू सजीवांसाठी आवश्यक असल्याने चंद्रावर त्यांची निर्मिती करणं हे प्राधान्य असल्याचं संशोधन करणाऱ्यांनी सांगितलं आहे. या मोहिमेची आखणी केलेले संशोधक झ्यांग यूअनझ्यून यांनी केली आहे. त्यांनी त्यांच्या या मोहिमेबाबत बोलताना सांगितलं की या मोहिमेचा उद्देश हा मंगळावरही मानवी वस्ती तयार करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणं हा आहे.