चटकदार चायनीज भेळ

साहित्य – दोनशे ग्रॅम नुडल्स, चमचाभर कॉर्नफ्लॉवर, एक वाटी साखर, एक चमचा व्हिनेगर, अर्धा चमचा तिखट, मीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची, अर्धी वाटी टोमॅटोचे बारीक तुकडे, कोथिंबीर आणि तेल.

कृती – चायनिज भेळ करताना सर्वप्रथम उकळत्या पाण्यात थोडेसे मीठ घालून त्यात नुडल्स पाण्यात उकडून थंड कराव्यात. ताटात पसरून त्यावर कॉर्नफ्लॉवर पसरा व नुडल्स सुटय़ा कराव्या. गरम तेला त्यात मग कुरकुरीत तळून घ्या. साखरेत दोन वाटय़ा पाणी घालून ते गॅसवर ठेवा. साखर विरघळून उकळी आल्यावर जरासे पाणी आटवायचे. जास्त घट्ट होऊ देऊ नये. साखरेचे पाणी थंड करून त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, व्हिनेगर, तिखट, मीठ, कोथिंबीर, मिरच्यांचे तुकडे घालून एकजीव करा. या सॉसमध्येच तळलेल्या नुडल्स घालून मिक्स करून लगेच खायला द्या. नुडल्स घालून जास्त ढवळू नका.