व्यापारासाठी काहीपण, चिनी व्यापाऱ्याने केला मुलाचा ‘असा’ वापर

सामना ऑनलाईन । बीजिंग

आपण बनवत असलेल्या वस्तू अगर पदार्थ लोकप्रिय व्हावेत या प्रयत्नात तमाम व्यापारी असतात. त्यामुळे व्यापार वाढवण्यासाठी नेहमीच नवनवीन युक्त्यांचा वापर करण्यावर त्यांचा भर असतो. पण, चीनमधल्या एका व्यापाऱ्याने चक्क आपल्या मुलालाच गिनिपिगसारखं वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

चीनमध्ये हेनान प्रांतात राहणारा चँग नावाचा माणूस कपड्यांचा व्यापारी आहे. तो बनवत असलेल्या स्टॉकिंगची मजबुती दाखवण्यासाठी त्याने आपल्या मुलाला त्या स्टॉकिंगमध्ये भरून झोपाळा झुलवल्याप्रमाणे जोरात वरखाली झुलवलं. या व्हिडिओने काही क्षणातच लाखांचे हिट्स मिळवले आहेत. आपल्या उत्पादनाला वेगळेपण मिळवून देण्यासाठी तसंच ग्राहकाला उत्पादनाच्या टिकाऊपणाची खात्री पटावी म्हणून हा व्हिडिओ बनवल्याचं चँगचं म्हणणं आहे.

अर्थात हा व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर चँगला काही नेटकऱ्यांनी स्वतःच्या मुलाला अशा प्रकारे वागणूक देणं हा छळ असल्याचं म्हणत धारेवर धरलं आहे. तर काहींनी त्याच्या या युक्तीला दाद दिली आहे.

पाहा व्हिडिओ-