Moods आणि Attitude

चिन्मय मांडलेकर

तुमची आवडती फॅशन…फॅशन ही त्यावेळेच्या मूडवर अवलंबून असते.

फॅशनची व्याख्या…फॅशन म्हणजे ती तुम्ही सहज कॅरी करता.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता?…कम्फर्टेबल कपडय़ांना मी प्राधान्य देतो.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की?…ही. तुमचं ऑटिटय़ूडही तितकेच महत्त्वाचे असते.

आवडती हेअरस्टाईल?…लांब केस खूप आवडतात. ती ठेवली होती त्याला बरीच वर्षे झाली.

फॅशन जुनी की नवी?…त्यावेळी ट्रेण्डमध्ये जी फॅशन असते ती फॉलो करायला आवडते.

आवडता रंग?…निळा.

तुमच्या जवळच्यांना तुमची कोणती फॅशन आवडते…मी जेव्हा बरे कपडे घालतो तेव्हा माझ्या बायकोला आवडतं. साधारणपणे टी-शर्ट आणि जीन्स मला चांगलं दिसतं असं सगळे म्हणतात.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?…स्ट्रीट शॉपिंग करायला आवडते, पण करून बरीच वर्षे झाली. आता नाही करत.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता?…टी-शर्ट, जीन्स.

ज्वेलरीमध्ये काय आवडते?…कडं.

आवडता ब्रॅण्ड…लिवाईस, मर्चंण्ट टायर.

फॅशन फॉलो कशी करता?…मी फॅशन फॉलो करत नाही. जे वाटतं, जे शोभतं तेच घालतो.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?…माझी बायको मला फॅशनबाबत अपडेट करत असते.

ब्युटी सिक्रेट…ऑटिटय़ूड इज ब्युटी सिक्रेट.

टॅटू काढायला आवडतो का?…नाही.

 तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी…हेअरब्रश, माऊथ फ्रेशनर आणि अमृत मलम. अमृत मलमवर माझा खूप विश्वास आहे. मेकअप करण्याआधी मी चेहऱयाला लावतो.

फिटनेससाठी...खाण्याच्या वेळा पाळा.