चित्रांची रंगीबेरंगी वाट

ज्यांना आपल्या मनातील कल्पना, भावना, निसर्ग, माणसे, प्राणी अशा गोष्टी चित्ररूपाने कागदावर उतरवणे आवडते असे विद्यार्थी चित्रकलेत करीयर करू शकतात. काही वेळा चित्रकलेत करीयर करणाऱया कलाकाराला काही गोष्टी उपजत येतात, बऱयाचशा शिकाव्याही लागतात. उपजत कौशल्यांचा उपयोग करून चित्रकलेत करीयर करता येते. करीयर नाही करता आले तरी दैनंदिन आयुष्य आनंदी जगण्यासाठीही ही कला शिकता येते.
फाईन आर्टस् आणि कमर्शियल आर्टस् या विभागात चित्रकलेतील अभ्यासक्रमांचे विभाजन केले जाते. चित्रकलेच्या अभ्यासात शिल्पकला, म्युरल्स, धातूकला अशा विविध कलांचाही समावेश असतो. निसर्ग, माणसे, प्राणी, अवकाशातील रंगांची उधळण जशी या कलेत अंतर्भूत असते तशीच काष्ठशिल्प, धातुशिल्प, शिलाखंडातून केलेली निर्मिती कशी करावी या विषयांचाही या अभ्यासक्रमात समावेश असतो. चित्रकलेतील विविध प्रकारांत जसेच्या तसे चित्र काढले जाते. त्याउलट त्याला भावलेले तो सहज कागदावर काढतो. याच्या पुढच्या टप्प्यात अबोध चित्रकला किंवा ऍबस्ट्रक्ट चित्रकलेचा अभ्यास असतो. यात सौंदर्यशास्त्र, शरीररचना, रंगसंगती कशी करावी, याविषयी शिकवले जाते. या क्षेत्रात करीयर करण्यासाठी सराव करणे महत्त्वाचा ठरतो.

अभ्यासक्रम
– शाळेत असताना ज्यांनी इंटरमिजिएट चित्रकलेची परीक्षा दिली आहे त्यांना थेट दहावीनंतरच जी.डी. आर्टस् या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. चित्रकला परीक्षेत ज्यांना ‘अ श्रेणी’ किंवा ‘ब श्रेणी’ मिळाली आहे ते प्रवेश घेऊ शकतात.
– पहिले वर्ष फाऊंडेशन वर्ष म्हणून ओळखले जाते. त्यानंतर फाईन किंवा कमर्शियल अशी विभागणी होते.
– चित्रकलेची आवड आहे, पण इंटरमिजिएट परीक्षा दिलेली नसेल तर बारावी पूर्ण करून बॅचलर इन फाईन आर्टस् (बीएफए)ला प्रवेश घेता येतो.

महाविद्यालये
सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्, डी.एन. रोड, धोबी तलाव, फोर्ट
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टस्, भारती विद्यापीठ कॅम्पस, पुणे-सातारा रोड, धनकवडी, पुणे