‘बकरी ईद में बचेंगे तो मोहरम में नाचेंगे’, काँग्रेसचा पवारांना टोला

1
mallikarjun kharge sharad pawar

सामना ऑनलाईन । मुंबई

ज्याचे जास्त खासदार त्याचा पंतप्रधान होईल. आघाडीने पंतप्रधानपदाचा उमेदवार देऊ नये असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. याला काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘बकरी ईद में बचेंगे तो मोहरम में नाचेंगे’ असा टोला लगावत आधी भाजपला हरवणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान व्हाकेत हीच देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे व आम्ही सर्वजण मिळून त्यासाठीच प्रयत्न करीत आहोत, असे खरगे यांनी मंगळवारी म्हटले होते. त्या आधी भाजपविरोधातल्या आघाडीत पंतप्रधानपदाचा उमेदवार संख्याबळावर ठरवणार असल्याचे वक्तक्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. ही बाब निदर्शनाला आणली असता क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी ‘बकरी ईद में बचेंगे तो मोहरम में नाचेंगे’ असे सांगितले आणि जोरदार हशा पिकला. देशात भाजपकिरोधी आघाडी उभारण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीकरूनही चर्चा रंगली आहे, मात्र भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला सत्तेतून पायउतार करणे या मुद्द्याला सर्वांनी प्राधान्य दिले पाहिजे. देशात भाजपविरोधी वाताकरण तयार करण्यासाठी सर्व प्रादेशिक पक्षांनाही एकत्र केले पाहिजे. जेव्हा ही आघाडी भाजपला हरवेल तेव्हाच नेतृत्व करण्याची संधी मिळणार असल्याचे खरगे यांनी स्पष्ट केले.

– राहुल गांधी यांनी संघाच्या बौद्धिकाला जाऊ नये
राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण असल्याची चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. आपल्या संघ कार्यालयात कुठेही तिरंगा न फडकवणाऱ्या संघाच्या बौद्धिकाला राहुल गांधी यांनी जाऊ नये असेच आपले मत असल्याचे खरगे यांनी स्पष्ट केले.